मिलिंद एकबोटेंवर दोन समाजांमध्ये तेढ निर्माण केल्याचा आरोप; पुण्यात 2 गुन्हे दाखल
Continues below advertisement
प्रक्षोभक वक्तव्य करून दोन समाजांमध्ये तेढ निर्माण केल्या प्रकरणी मिलिंद एकबोटेंवर कोंढवा पोलिस ठाण्यात दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पुणे महापालिकेच्या वतीने कोंढवा भागात मुस्लिम समाजासाठी हज हाऊस उभारण्यात येणार आहे. मिलिंद एकबोटेंनी याला विरोध करत प्रक्षोभक वक्तव्य करून ते सोशल मिडीयावर व्हायरल केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. या बद्दल संभाजी ब्रिगेडने तक्रार दिलीय.
Continues below advertisement