देहूतील तुकाराम बीज सोहळ्याचं विहंगम दृश्य, पानं-फुलं, तुकोबांच्या प्रतिमांनी मंदिराला आकर्षक सजावट
पुणे : वारकरी संप्रदायाचे बंडातात्या कराडकरांची ही भूमिका वैयक्तिक आहे. आम्ही शासनाच्या नियमानेच बीज सोहळा पार पाडणार आहोत. असं म्हणत बंडातात्यांनी संयमाची भूमिका घ्यावी असं आवाहन देहू संस्थानने केलं होतं. तसेच आज तुकोबा महाराज असते तर त्यांनी शासनाची भूमिका मान्य केली असती, असंही नमूद केलं. आळंदी देवस्थानाने देखील शासकीय नियमांच्या अधीन राहूनच बीज सोहळा पार पाडणार अस म्हटलं. मात्र, तरीही बंडातात्या त्यांच्या भूमिकेवर ठाम राहिले आणि त्यांनी आज भजन सत्याग्रह आंदोलन केलंच.