आरोग्य भरती परीक्षेतील पेपरफुटी प्रकरणात बड्या अधिकाऱ्यांचा हात? सहसंचालक डॉ. महेश बोटले अटकेत
Continues below advertisement
महाराष्ट्र राज्याच्या आरोग्य विभागाच्या भरती परीक्षेतील पेपरफुटी प्रकरणात वरिष्ठ अधिकाऱ्यांचा सहभाग असल्याचं आता उघडकीस आलं आहे. या प्रकरणात आता राज्याच्या आरोग्य विभागाचे सहसंचालक डॉ. महेश बोटले यांना अटक करण्यात आली आहे. आरोग्य विभाग भरतीचा पेपर सेट करण्यात डॉ. महेश बोटले सहभागी होते. त्यांनीच हा पेपर फोडल्याचा पोलिसांना संशय आहे. आरोग्य विभागातील भरती प्रकरणात आतापर्यंत बारा जणांना अटक करण्यात आली आहे.
Continues below advertisement