Tim Cook Meet Sandeep Ranade : Apple CEO पिंपरी चिंचवडमधील आयटी अभियंत्याच्या भेटीला
अॅपलचे सीईओ टीम कुक यांनी पिंपरी चिंचवडमधील आयटी अभियंता संदीप रानडेंची भेट घेतली. संदीप रानडेंनी 'नादसाधना' हे अँप विकसित केलंय. दोन वर्षांपूर्वी या अॅपला कंपनीच्या 'इनोव्हेशन कॅटेगिरी'चे जागतिक विजेतेपद मिळाले होते. अन आता तर टीम कुक यांनी थेट संदीपशी पंधरा मिनिटं चर्चा केली. त्याच अॅपचा वापर करत संदीपने एक गीत ही गाऊन दाखवलं. दरम्यान या भेटीबाबत जाणून घेतलंय आमचे प्रतिनिधी नाजिम मुल्ला यांनी.