Mumbai Pune Expressway वर बोरघाटात भीषण अपघात, तिघांचा मृत्यू, सहा जखमी, सहा वाहनं एकमेकांना धडकली
मुंबई : मुंबई पुणे एक्सप्रेसवर बोरघाटात सहा वाहनं एकमेकांवर धडकून भीषण अपघात झाला. यामध्ये दोन टेम्पो, कार, खाजगी बस आणि ट्रेलरचा समावेश आहे. या अपघातात तीन प्रवाशांचा मृत्यू तर सहा प्रवासी जखमी झाले आहेत. आज पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास पुण्याहून मुंबईकडे येणाऱ्या भरधाव येणाऱ्या कोंबड्या वाहून नेणाऱ्या टेम्पोने पुढे जाणाऱ्या टेम्पोला जोरदार धडक दिली. यामुळे झालेल्या अपघातात टेम्पोने स्विफ्ट कारला धडक दिली, तर दुसऱ्या टेम्पोने कॉईल वाहून नेणाऱ्या ट्रकला धडक दिली. त्याच वेळी एका ट्रकने खाजगी बसला पाठीमागून धडक दिली.