Coronavirus | पिंपरी चिंचवडमध्ये तीन सख्ख्या भावांचा कोरोनामुळे मृत्यू
पिंपरी चिंचवडमध्ये कोरोनामुळे तीन सख्ख्या भावांचा मृत्यू झाला आहे. सुरुवातीला पुतण्याला कोरोनाची लागण झाली, याचा चुलत्याला बसला. यात त्यांचा मृत्यू झाला आणि नंतर भावाच्या मृत्यूने स्वतःला सावरु न शकलेल्या दोघा भावांचीही मृत्यूंशी झुंज संपली. 61, 66 आणि 63 अशी तिघांची वय होती. यांच्यासह कुटुंबातील 18 सदस्यांना कोरोनाची लागण झाली होती. इतर सर्वांनी कोरोनावर मात केली पण हे तिघे सख्खे भाऊ मात्र यातून वाचू शकले नाहीत. तिघांना आधी वेगवेगळे आजारही होते.