PUNE : ED ने सील केलेल्या बंगल्यात चोरट्यांचा डल्ला, सहा लाख रुपयांचा ऐवज लुटला
ED ने सील केलेल्या चतुर्श्रुंगी येथील आलिशान बंगल्यात चोरट्यांनी सहा लाखांचा ऐवज केला चोरी, भाग्यश्री अमित कुलकर्णी यांनी चतुर्श्रुंगी पोलिस ठाण्यात दिली फिर्याद, 16 ऑक्टोबर 2018 ते 11 ऑक्टोबर 2021 दरम्यान चोरी झाल्याची माहिती. चोरट्यांनी कुलकर्णी यांच्या बंगल्याचे सील तोडून आठ LED टीव्ही, संगणक, 3 सीडी प्लेअर,लॅपटॉप, इलेक्ट्रॉनिक वस्तू, देवघरातील चांदीच्या वस्तू, कॅमेरा, पिठाची गिरणी अशा वस्तूवर मारला डल्ला.