Pune | छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त लाल महालात थरारक प्रात्यक्षिकं | ABP Majha
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त पुण्यातील लाल महाल येथे तरुणांनी मावळ्यांच्या वेशात लाठी काठी ,दांडपट्टा आणि तलवारबाजी यांची थरारक प्रात्यक्षिके सादर केली. यामध्ये तलवारबाजी, कुऱ्हाड, भाला फिरवणे, नारळ डोक्यावर ठेवून तो काठीने फोडणे अशा अनेक साहसी खेळांनी प्रत्यक्षदर्शींच्या डोळ्यांचे पारणे फेडले. मावळ्यांच्या पराक्रमाची आठवण करून देणारे पोवाडेही यावेळी सादर करण्यात आले..