Supriya Sule : फडणवीस साहेब आपसे ये उम्मीद नही थी
चिंचवड पोटनिवडणुकीबाबत महाविकास आघाडीकडून दोन दिवसांत चित्र स्पष्ट होईल, मात्र त्याआधी तर्कवितर्क लावणार नाही असं वक्तव्य राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केलंय. त्याचसोबत महाविकास आघाडी सरकारने आपल्याला तुरूंगात टाकण्याचा कट रचला होता, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी एबीपी माझाच्या कार्यक्रमात केला होता. त्यावरही सुप्रिया सुळे यांनी आपसे ये उम्मीद नही थी अशी टिप्पणी केलीय.