Baramati : माळेगाव साखर कारखान्याच्या संचालक मंडळाला दणका, काय आहे प्रकरण?
Continues below advertisement
बारामतीतल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाला साखर आयुक्तालयानं चपराक दिलीय. कारखान्याच्या कार्यक्षेत्रात 10 गावं नव्यानं जोडण्याच्या निर्णयाला प्रादेशिक सहसंचालकांनी स्थगिती दिली आहे. या कारखान्यावर राष्ट्रवादीची सत्ता आहे. माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत 10 गावे नव्याने जोडण्याचा निर्णय माळेगावच्या संचालक मंडळाने आवाजी मतदानाने मंजूर केला होता. हा निर्णय घेताना सभासदांनी कडाडून विरोध केला. तरीही संचालक मंडळाने आवाजी मतदानाने ठराव मंजूर केला. भाजपचे रंजन तावरे आणि चंद्रराव तावरे यांनी या निर्णयाला स्थगिती द्यावी अशी मागणी साखर आयुक्तालयाकडे केली होती. त्यानंतर ही स्थगिती देण्यात आलीय.
Continues below advertisement