Ranade Institute रानडे इन्स्टिट्यूटमधील पत्रकारिता विभाग स्थलांतरित करण्याच्या निर्णयाला स्थगिती

Continues below advertisement

पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधील पत्रकारिता विभाग सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात हलवण्याच्या निर्णयाला विद्यापीठाकडून अखेर स्थगिती देण्यात आलीय.  पुण्यातील पत्रकारांनी रानडे इन्स्टिट्यूटमधुन पदव्युत्तर पदवीचा अभ्यासक्रम विद्यापीठाच्या आवारात हलवण्यास आणि पत्रकारितेच्या अभ्यासक्रमाचे मास कम्युनिकेशन आणि मिडीया स्टडीजमधे एकत्रीकरण करण्यास विरोध केला होता.  त्यानंतर उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी 14 ऑगस्टला रानडे इन्स्टिट्यूटला भेट देणार असल्याचे जाहीर केले होते.  पण त्या आधीच विद्यापीठाकडून रानडे इन्स्टिट्यूटमधुन पत्रकारीतेचा कोर्स हलवण्याच्या निर्णयाला स्थगिती देण्यात आलीय.

 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram