Raj Thackeray PC : राज्य सरकारलाच महापालिका निवडणुका घेण्याची इच्छा नाही : राज ठाकरे : ABP Majha
प्रशासक नेमून महानगर पालिकांवर वचक ठेवण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे. राज्य सरकारलाच महानगरपालिका निवडणूक घेण्याची इच्छा नाही. ओबीसी आरक्षणाचा मुद्दा पढे करुन निवडणूका लांबणीवर टाकण्याचा घाट घातला जातोय, असे आरोप राज ठाकरे यांनी केले आहेत. राज ठाकरे पुणे दौऱ्यावर असून तिथे माध्यमांशी त्यांनी संवाद साधला.
यावेळी बोलताना राज ठाकरे म्हणाले, "ओबीसी राजकीय आरक्षण बाबत सर्व पक्षांचे एकमत झाले आहे. त्यावर राज ठाकरे म्हणाले की, निश्चित स्थगिती दिली पाहिजे. पण त्यामुळे हे काम पटकन होणार असेल तर याला स्थगिती मला मान्य आहे. निवडणुका आत्ता नकोत हे सरकारच्या फायद्याचं असेल, त्यात काही काळंबेरं असेल तर तेही आपल्याला समजावून घ्यायला हवं. सगळ्या महानगरपालिका सरकारच चालवणार. मग त्यावर प्रशासक नेमणार आणि मग सरकारच बघणार. हे सगळे उद्योगधंदे पण सरकारचे चालू आहेत. मला असं वाटतं की पुढे असं नको व्हायला की ओबीसींचा विषय पुढे करुन सरकार काही गोष्टी साध्य करुन घेत आहे. पण ओबीसी आरक्षणासंदर्भातल्या जनगणना वगैरे गोष्टी झाल्यानंतर निवडणुका घ्यायला काहीच हरकत नाही"