Shrirang Barne on Ajit Pawar : अजित पवारांच्या राष्ट्रवादीने माझा शंभर टक्के प्रचार केला नाही Maval
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपिंपरी चिंचवड: लोकसभा निवडणुकीचे राज्यातील पाचव्या आणि अंतिम टप्प्यातील मतदान सोमवारी पार पडले. आता 4 जूनला लोकसभा निवडणुकीचा निकाल (Lok Sabha Election Results) जाहीर होईल. मात्र, त्यापूर्वीच महायुतीमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. शिंदे गटाचे मावळ लोकसभा मतदारसंघातील उमेदवार श्रीरंग बारणे (Shrirang Barne) यांनी अजित पवार गटावर गंभीर आरोप करत आपल्या मनातील खंत बोलून दाखवली आहे.
मावळ लोकसभेत महायुतीत खदखद होती. अजित पवारांच्या राष्ट्रवादीने माझा 100 टक्के प्रचार केला नाही, अशी कबुली महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी दिली. मात्र, तरीही मावळमध्ये माझा 2 लाख 50 हजार 374 मतांनी विजय होईल, असा दावा श्रीरंग बारणे यांनी केला. त्याचवेळी माझा प्रचार न करणाऱ्यांची नावं मी अजित पवार यांच्याकडे दिल्याचे बारणे यांनी सांगितले. अजित पवार गटाने माझा शंभर टक्के प्रचार केला असता तर ठाकरे शिवसेनेचे उमेदवार संजोग वाघेरे यांचे डिपॉझिट जप्त झालं असतं, असा दावा श्रीरंग बारणेंनी केला. यापूर्वी संजोग वाघेरे यांनीही 1 लाख 72 हजार 704 मतांनी माझा विजय होईल, असा दावा केला होता. मात्र, श्रीरंग बारणे यांनी हा दावा खोडून काढत आपल्या विजयाचं गणित मांडलं. यावर आता महायुती आणि मविआच्या गोटात काय प्रतिक्रिया उमटणार, हे पाहावे लागेल.