Shivajirao Bhosale Bank Scam | आमदार अनिल भोसले यांना अटक
Continues below advertisement
पुण्यातील शिवाजीराव भोसले सहकारी बॅंकेत कोट्यावधी रुपयांचा घोटाळा केल्याप्रकरणी बॅंकेचे संचालक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानपरिषद आमदार अनिल भोसले यांना पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने मंगळवारी (25 फेब्रुवारी) रात्री उशिरा अटक केली. आमदार अनिल भोसले यांच्यासह बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तानाजी पडवळ बॅंकेचे दोन अधिकारी एस व्ही जाधव आणि शैलेश भोसले यांनाही अटक करण्यात आली आहे. शिवाजीराव भोसले सहकारी बॅंकेत 71 कोटी 78 लाख रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप आहे.
Continues below advertisement