Sharad Pawar Yugendra pawar : बारामतीचा दादा बदलायचाय, बारामतीत कार्यकर्ते आक्रमक

Baramati Vidhan Sabha Election 2024 : बारामती लोकसभा मतदारसंघात नणंद विरुद्ध भावजय (Supriya Sule vs Sunetra Pawar) सामना पाहिला. आता विधानसभेला (Vidhan Sabha Election) काका विरुद्ध पुतण्या अशी लढत बारामतीत होणार का? असा प्रश्न विचारला जातोय. बारामतीतून विधानसभेला अजित पवारांच्या विरोधात युगेंद्र पवार (Ajit Pawar vs yugendra pawar) उभा राहणार असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे तसेच कार्यकर्त्यांनी देखील युगेंद्र पवारांच्या उमेदवारीची मागणी शरद पवारांकडे केली. 

आज बारामतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते शरद पवारांना भेटले आणि मागणी केली आम्हाला बारामतीचा दादा बदलायचा आहे. आता एक दादा नको म्हटल्यावर दुसरा कोणता दादा असेल याची उत्सुकता तुम्हाला देखील असेल, तर त्याच उत्तर आहे युगेंद्र दादा होय. युगेंद्र पवार हे अजित पवारांचे सख्खे पुतणे आहेत. हाच पुतण्या अजित पवारांना आगामी विधानसभेत आव्हान देणार असल्याची चर्चा सुरू आहे

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola