Sharad Pawar on Ajit Pawar : अजित पवारांबाबतची चर्चा केवळ तुमच्या मनात, आमच्या नाही : शरद पवार
विरोधी पक्षनेते अजित पवार आणि भाजप यांच्या जवळीच्या चर्चा केवळ तुमच्या मनात आहेत, आमच्या कुणाच्याही मनात नाही. या चर्चांना अजिबात महत्व नाही, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सध्याच्या राजकीय चर्चांवर भाष्य केलं. ते पुण्यात बोलत होते. अजित पवारांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक आमदार भाजपच्या संपर्कात असल्याच्या राजकीय चर्चा सुरु आहेत. राष्ट्रवादीच्या अनेक आमदारांनी अजित पवार जी भूमिका घेतील ती मान्य असल्याचं म्हटलं आहे. त्या पार्श्वभूमीवर शरद पवारांच्या भूमिकेकडे लक्ष लागलं होतं.