Sharad Pawar यांच्या बारामतीमधील दिवाळी पाडवा, राष्ट्रवादीतील फुटीनंतर गोविंद बागेत पहिलाच पाडवा
शरद पवार यांचे निवासस्थान असलेल्या बारामतीमधील गोविंद बागेत आज दिवाळी पाडवा साजरा होत आहे. राज्यभरातून पदाधिकारी आणि कार्यकर्ते दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी आले आहेत. गोविंद बागेबाहेर कार्यकर्ते जमायला सुरुवात झालीय. शरद पवार, सुप्रिया सुळे कार्यकर्त्यांची भेट घेत शुभेच्छांचा स्वीकार करत आहेत. महत्त्वाचं म्हणजे राष्ट्रवादीमधील फुटीनंतर यंदाच्या गोविंद बागेतील दिवाळी पाडव्याला उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार का याबाबत उत्सुकता आहे. दरम्यान गोविंद बागेबाहेर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आलाय.