Ajit Pawar : शेतकरी मेळाव्याच्या पत्रिकेवर अजितदादांचं नाव,दांडी मारल्यानं थेट शरद पवारांची उपस्थिती

अजित पवार म्हणतात, माझे कुठलेही नियोजित कार्यक्रम नव्हते... असं असतानाच पुरंदर हवेलीत राष्ट्रवादी काँग्रेसनं आयोजित केलेल्या युवक आणि शेतकरी मेळाव्याचं आमंत्रण पत्रिका समोर आलीय... त्यामध्ये मार्गदर्शन म्हणून अजित पवार तर प्रमुख पाहुण्या खासदार सुप्रिया सुळे होत्या... पण, अजित पवारांनी कार्यक्रम रद्द केले, आणि त्यांच्या जागी कार्यक्रमात खुद्द शरद पवार उपस्थित झाले... त्यामुळेच अजित पवारांनी नकार दिला म्हणून शरद पवारांनी कार्यक्रमासाठी होकार दिला का? असा सवाल उपस्थित होतोय... आज दिवसभर अजित पवारांच्या भाजप प्रवेशा संदर्भात अनेक चर्चांचं वादळ सुरु असताना, शेवटच्या क्षणी शरद पवारांनी पुढाकार घेत, पक्षाचा नियोजित कार्यक्रमात उपस्थितीत लावणं, याला अनेक राजकीय अर्थ लागू शकतात...

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola