Online Exam Issue | पुणे विद्यापीठाच्या अंतिम वर्ष परीक्षेवेळी सर्व्हर डाऊन, विद्यार्थ्यांचा गोंधळ
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या ऑनलाईन आणि ऑफलाईन परीक्षा सध्या सुरु आहेत. आज दुपारी 1 ते 2 च्या दरम्यान असलेल्या ऑनलाईन परीक्षेदरम्यान विद्यापीठाचं सर्व्हर डाऊन झाल्यामुळे एकच हल्लकल्लोळ झाला. सर्व्हरच डाऊन झाल्यामुळे पेपर सोडवताना विद्यार्थ्यांना तांत्रिक अडचणींच्या परीक्षेचा सामना करावा लागला. सर्व्हरच्या प्रॉब्लेममुळे विद्यार्थी सोडवलेला ऑनलाईन पेपर सबमिट करू शकले नाहीत. यामुळे विद्यार्थ्यांना परत लॉगईन करुन तो पेपर परत सोडवावा लागला आणि परत लॉग इन केल्यावर पुर्णपणे नवीन प्रश्न असलेला पेपर समोर आल्याची तक्रार विद्यार्थी करत आहेत.