Satish Wagh Pune murder case | सतीश वाघ यांच्या हत्या प्रकरणाचा घटनाक्रम Abp Majha

Satish Wagh Pune murder case | सतीश वाघ यांच्या हत्या प्रकरणाचा घटनाक्रम Abp Majha
भाजपचे विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांच्या हत्या प्रकरणात धक्कादायक खुलासा घडलाय.. 
मुलाच्या मित्रासोबत असलेल्या अनैतिक
संबंधातून मोहिनी वाघ यांनी, पती सतीश वाघ यांची हत्या घडवून आणल्याचं पोलीस तपासात उघड झालं... गुन्हे शाखेने ४८ वर्षीय मोहिनी वाघला अटक केली असून ३० डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलीये. ३२ वर्षांचा प्रयकर अक्षय जावळकर हा मोहिनी वाघ यांच्या मुलाचा मित्र आहे.. मुलाच्याच वयाचा असल्याने अक्षय आणि मोहिनीचे अनैतिक संबंध असतील अशी शंका सुरुवातीला कोणाला आली नाही. मात्र सतीश वाघ यांना हे समजताच मोहिनी-सतीश आणि अक्षय यांच्यामध्ये वाद सुरु झाले होते. अनेक वर्षे त्यांच्यातील वाद धुमसत होता आणि त्यातून सतीश वाघ त्यांची हत्या झाल्याचं समोर आलंय.. सतीश वाघ यांची नऊ डिसेंबरला अपहरण करून हत्या करण्यात आली होती... त्यांच्या शरीरावर तब्बल ७० वार करण्यात आले होते. त्यानंतर मृतदेह शिंदवणे घाटात फेकून देण्यात आला..

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola