Satish Wagh Murder Case : सर्वात मोठा खुलासा; प्रेम प्रकरणातून बायकोनेचं सुपारी देऊन खून केला

Continues below advertisement

Satish Wagh Murder Case : भाजप आमदार योगेश टिळेकर (Yogesh Tilekar) यांचे मामा सतीश वाघ (Satish Wagh Murder Case) यांच्या हत्या प्रकरणात सर्वात मोठी खुलासा झालाय. सतीश वाघ यांच्या पत्नी मोहिनी वाघ (Mohini Wagh) यांनीच त्यांना संपवण्यासाठी सुपारी दिली असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. या प्रकरणात गुन्हे शाखेने सतीश वाघ यांच्या पत्नीला अटक केली आहे. प्रेम प्रकरणातून सुपारी देऊन खून केल्याचे उघड झाले आहे. 

प्रेम प्रकरणातून पत्नीने सतीश वाघ यांचा खून केल्याचे समोर 

याबाबत अधिकची माहिती अशी की, आमदार योगेश टिळेकर (Yogesh Tilekar) यांच्या मामा सतीश वाघ यांच्या हत्याप्रकरणी (Satish Wagh Murder Case) त्यांच्याच बायको मोहिनी वाघ हिने सुपारी दिली होती. शेजारी राहणाऱ्या व्यक्तीसोबत मोहिनी वाघ यांचे प्रकरण होतं. या प्रेम प्रकरणात सतीश वाघ आडवे येत असल्याने त्यांना पाच लाखाची सुपारी देऊन संपवण्यात आले आहे. याबाबतची कबुली मोहिनी वाघ यांनी पोलिसांकडे दिली आहे. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणात मोठा खुलासा केलाय. 

सतीश वाघ यांच्या हत्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे जाणून घेऊयात...या प्रकरणी पोलिसांनी आत्तापर्यंत 5 जणांना अटक केली आहे. या प्रकरणी अक्षय जवळकर याला सुपारी देण्यात आली असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram