Pune : पुण्यातील सॅलीसबरी पार्कच्या नामांतराचा मुद्दा तापला, नागरिकांचं गांधीगिरी पद्धतीने आंदोलन
पुण्यातील सॅलीसबरी पार्कमधील पुणे महापालिकेच्या उद्यानाचे नाव बदलून भाजपचे स्थानिक नगरसेवक श्रीनाथ भिमाले यांनी स्वतःच्या वडीलांचे नाव दिलेय. स्थानिक नागरिकांनी हे नाव बदलण्यास तीव्र विरोध केलाय. सॅलिसबरी पार्कमधील हे उद्यान स्थानिक लोकांनी अनेक वर्षे संघर्ष करुन मिळवले असताना भिमाले यांनी या उद्यानाचे नाव बदलल्याने संताप व्यक्त होतोय. आज इथल्या नागरिकांनी गांधीगीरी पद्धतीने या नाव बदलण्यास विरोध केला आणि सह्यांची मोहीम राबवली. मागील आठवड्यात देखील या नागरिकांनी गांधीगिरी पद्धतीने आंदोलन केले होते.