Rohit Pawar : पुण्याजवळ पकडलेल्या पैशांचा व्हिडीओ असल्याचा रोहित पवारांचा दावा

Continues below advertisement

Rohit Pawar : पुण्याजवळ पकडलेल्या पैशांचा व्हिडीओ असल्याचा रोहित पवारांचा दावा 

खेडमध्ये जप्त केलेली पाच  कोटींची रोकड जप्त करण्यात आली आहे. आमदार रोहित पवारांकडून (Rohit Pawar)  पैशांचा व्हिडीओ ट्वीट करण्यात आला आहे.    पुण्याजवळ पकडलेल्या रक्कमेचा हा व्हिडीओ असल्याचा दावा  सत्ताधारी उमेदवारांना पहिला हप्ता 25 कोटींचा आल्याचा आरोप आमदार  रोहित पवारांनी केला आहे.  हे पैसे आमदार  शहाजी बापू पाटील यांची असल्याचे रोहित पवार म्हणाले. तसेच आज संध्याकाळपर्यंत जागावाटप जाहीर होणार असल्याचे देखील ते म्हणाले.   रोहित पवार म्हणाले, शहाजी पाटील यांचे पैसे आहेत अशी चर्चा आहे. एकूण पाच  गाड्या होत्या. 25 कोटी रुपये होते अशी माहिती आहे. लोकसभेला यांनी खूप पैसा वाटला मात्र तरीदेखील लोकांनी यांना स्वीकाराले नाही. आता विधानसभेला 50 कोटी वाटतील असं वाटतंय . जो मलिदा त्यांना मिळालाय तो वाटत आहे . मुंबईतून हा पैसा जात होता. पण महाराष्ट्रातली स्वाभिमानी जनता त्याला बाधणार नाही.  जागावाटप आज संध्याकाळपर्यंत जागावाटप जाहीर : रोहित पवार अनेक पदाधिकारी अजित पवारांच्या पक्षातील नाराज आहेत. अनेक जण आमच्या सोबत येत आहेत. जागावाटप आज संध्याकाळपर्यंत जागावाटप जाहीर होईल . चर्चा सकारात्मक झाली आहे. जागेच्या वादाचा जो आकडा येतोय तो कमी आहे, असे रोहित पवार म्हणाले.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram