Bank Robbery: पुणे जिल्ह्यात बँक ऑफ महाराष्ट्रच्या शाखेवर दरोडा, 30 ते 35 लाख रुपये आणि दागिने लंपास
पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यातील पिंपरखेड गावात बँक ऑफ महाराष्ट्रच्या शाखेवर दरोडा पडला आहे. ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून दुपारी दीड वाजताच्या सुमारास ही घटना घडली. दरोडेखोर सियाज कारमधुन बँकेत शिरले आणि पिस्तुलाचा धाक दाखवत बँकेतील कर्मचाऱ्यांकडून 30 ते 35 लाख रुपये आणि सोन्याचे दागिने हिसकावले. दरोडेखोरांच्या गाडीवर ' प्रेस ' लिहले होते असं प्रत्यक्षदर्शींच म्हणणं आहे.