पुण्यातील निर्बंध शिथिल, मॉल्स 50% क्षमतेने सुरू करण्याची परवानगी,ग्राहकांच्या स्वागतासाठी खास तयारी
पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पुणेकरांना मोठा दिलासा दिला आहे. सोमवारपासून (14 जून) पुण्यातील मॉल्स उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. तर सर्व दुकानं रात्री सात वाजेपर्यंत खुली राहतील. याशिवाय सोमवारपासून अभ्यासिका, वाचनालय सुरु करण्यास देखील परवानगी देण्यात आली आहे. तसंच हॉटेल आणि रेस्टॉरंट 50 टक्के क्षमतेने रात्री 10 वाजेपर्यंत सुरु राहतील. अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
Tags :
Corona Vaccination Covid Vaccination Corona Pune Police Pune Lockdown Pune Lockdown Murlidhar Mohol Pune Myor