Pune Health Department Recruitment | पुणे पालिकेच्या आरोग्य विभागात नोकर भरती, तरुणांकडून उत्तम प्रतिसाद
पुण्यात कोरोनाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव वाढतांना पाहायला मिळत आहे. यात पुणे महापालिकेच्या आरोग्य़ विभागात डॉक्टर्स, नर्स यासह इतर स्टाफ या रिक्त जागा आहेत. या जागा तातडीने भरण्यासाठी महापालिकेने प्रक्रिया सुरू केली आहे. डॉक्टर्स, नर्स आणि इतर आरोग्य कर्मचारी या काही जागा रिक्त आहेत. या भरती प्रक्रियेला नोकरी इच्छुकांचा चांगला प्रतिसाद पाहायला मिळाला. सोशल डिस्टन्सिंगचे सर्व नियम पाळत या भरती प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली.