Ravindra Salgaonkar on Ajit Pawar : अजित पवारांकडून धोका, रविंद्र साळगावर यांच्याडकून पोलिसात तक्रार

Continues below advertisement

Ravindra Salgaon on Ajit Pawar : अजित पवारांकडून धोका, रविंद्र साळगावर यांच्याडकून पोलिसात तक्रार

Pune News : अजित पवार यांच्याकडून आपल्या जीवाला (Ajit pawar) धोका आहे, असं म्हणत पुण्यातील भाजप पदाधिकाऱ्याने (BJP Official) पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.  भाजप पदाधिकारी रवींद्र साळगावकर यांनी खडक पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीमुळे सध्या राजकीय वातावरणात चर्चेला उधाण आलं आहे. 

रवींद्र साळगावकर पुण्यातील शिवाजीनगर मतदारसंघातील भाजपचे अध्यक्ष आहेत. त्यांनी पोलिसांत लेखी तक्रार दिली आहे. अजित पवार यांच्यापासून माझ्या जीवाला धोका असल्याचं त्यांनी तक्रारीत म्हटलं आहे. गणेशखिंड रस्त्यावर ई-स्क्वेअरच्या समोर एक प्लॉट आहे. त्यासंदर्भात त्यांनी तक्रार दिली आहे. यावर अजित पवारांची प्रतिक्रिया काय असेल याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram