#OXYGEN सोना अलॉज कंपनीतील ऑक्सिजन प्लांट सुरू,रामराजे नाईक निंबाळकर यांच्याशी प्लांटबद्दल बातचीत
सातत्याने वाढत जाणाऱ्या कोरोना बाधित रुग्णांसाठी सध्या ऑक्सिजनची कमतरता भासत आहे. जास्तीत जास्त ऑक्सीजन कसा उपलब्ध करता येईल यासाठी सर्व स्तरावरून सध्या प्रयत्न सुरू आहेत. अनेक कारखान्यांनी देखील ऑक्सिजन तयार करण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन करण्यात आले होते.. त्यानुसार विधान परिषदेचे सभापती राम राजे नाईक निंबाळकर यांच्या सातारा जिल्ह्यातील लोणंद येथील सोना अलॉज आ कंपनीत ऑक्सिजन निर्मितीला सुरुवात करण्यात आली आहे. इतर जिल्ह्यांना या ठिकाणी तयार होणाऱ्या ऑक्सिजन मुळे सातारा जिल्ह्याला बाहेरून ऑक्सिजन मागवण्याची आवश्यकता भासणार नाही. दररोज ऑक्सिजनचे पंधराशे सिलेंडर येथील प्लांटमधून भरले जातील.. या कंपनीच्या माध्यमातून सातारा जिल्ह्यात व्यतिरिक्त इतर जिल्ह्यांनाही ऑक्सिजनचा पुरवठा केला जाऊ शकतो असे रामराजे नाईक निंबाळकर यांनी सांगितले. आणखी काही कारखान्यांमधून अशाप्रकारे ऑक्सिजनची निर्मिती करता येते का यासाठी देखील आम्ही प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सांगितले.