Raj Thackeray speech Pune : Ajit Pawar यांचं कौतुक, हिंदूंसाठी फतवा, मुरलीधर मोहोळ यांची सभा गाजवली
पुणे : कुणीतरी उठतोय आणि जातीचं राजकारण करतोय, त्यामुळे महाराष्ट्राचं राजकारण बरबाद झाल्याचं सांगत 1999 साली राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून जातीयतेचं विष पेरलं गेल्याचा आरोप राज ठाकरेंनी (Raj Thackeray) केला. शरद पवारांसोबत राहूनही अजित पवार (Ajit Pawar) या माणसाने कधीही जातीपातीचं राजकारण केलं नाही असंही ते म्हणाले. जर काँग्रेससाठी मशिदीतून फतवे निघत असतील तर राज ठाकरे आज फतवा काढतोय की भारतीय जनता पक्षाला मतदान करा, अजित पवार आणि एकनाथ शिंदेंच्या उमेदवारांना भरघोस मतदान करा असं आवाहन राज ठाकरेंनी केलं.