Raj Thackeray Pune Rally 10 IMP Points: राज ठाकरे यांच्या भाषणातील 10 महत्वाचे मुद्दे

Raj Thackeray Pune Rally 10 IMP Points: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पुण्यातील गणेश कला क्रीडा मंच सभागृहातील सभेत जोरदार हल्लाबोल केला. त्यांनी अयोध्या दौऱ्याबाबत सांगताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार, एमआयएमवर जोरदार टीका केली.  पूर्वनियोजित अयोध्या दौरा तूर्तास स्थगित केला. या दौऱ्याला भाजप खासदार बृजभूषण सिंह यांनी विरोध केला होता. हा दौरा स्थगित का केला यावर आज राज ठाकरेंनी भाष्य केलं. पुण्यातील गणेश कला क्रीडा मंच सभागृहात बोलताना राज ठाकरे म्हणाले की, मी माफी मागावी याची मागणी केली, यांना आता 12-14 वर्षांनंतर जाग आली. यातून चुकीचे पायंडे पडत आहेत. विषय माफी मागण्याचाच आहे ना मग गुजरातमध्ये अल्पेश ठाकूर नावाच्या नेत्यांनं यूपी,बिहारच्या लोकांना हाकलून दिलं. ती लोकं मुंबईत आले, इथं आओ जाओ घर तुम्हारा. तिथं गुजरातमध्ये कोण माफी मागणार, असं राज ठाकरे म्हणाले. हे राजकारण समजून घेणं गरजेचं आहे. यांना आपलं हिंदुत्व झोंबलं, लाऊडस्पिकर झोंबले, असं राज ठाकरे म्हणाले.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola