Pune Bypoll Election : कसबा, चिंचवड निवडणूक बिनविरोध होण्यासाठी Raj Thackeray यांचाही पुढाकार
राज ठाकरे यांनीही फेसबुक पोस्ट लिहून कसबा आणि चिंचवडची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, असं आवाहन केलंय. जेंव्हा एखाद्या विद्यमान लोकप्रतिनिधीचं निधन होतं तेंव्हा तिथे होणारी पोटनिवडणूक शक्यतो बिनविरोध करावी असं आवाहन राज ठाकरे यांनी केलंय. दरम्यान भाजपच्या बिनविरोधाच्या भूमिकेसाठी एकनाथ शिंदेंनीही प्रयत्न सुरू केल्याच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी केलेलं आवाहन लक्षवेधी ठरलंय.