Raj Thackeray Full Interview : ... पळत पळत आंघोळ करायची का? राज ठाकरेंची धमाकेदार मुलाखत

Raj Thackeray Full Interview : ... पळत पळत आंघोळ करायची का? राज ठाकरेंची धमाकेदार मुलाखत  राज्यातील सत्तेत सौंदर्यदृष्टी असायला हवी तरच सगळं नीट दिसेल. सरकारमध्ये आर्किटेक्टला कमी आणि महापालिकेतील इंजिनिअरला जास्त महत्व दिलं जातं. त्यात शहर नियोजनाचा विचार केला जात नाही. त्यामुळे शहरं बकाल पडली आहे. त्यासाठी राज्यकर्त्यांना योग्य दृष्टी असावी लागते", असा हल्लाबोल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे.  यावेळी बीडच्या सर्किट हाऊसचं उदाहरण देत त्यांनी सर्किट हाऊच्या रचनेवर भाष्य केलं आहे. ते म्हणाले की, अनेक गेस्ट हाऊसमध्ये भली मोठी बाथरूम असतात. तिथे काय पळत पळत येऊन आंघोळ करायची का ? असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला आणि सभागृहात हशा पिकला. जागतिक आर्किटेक्ट दिनानिमित्त शहर नियोजन, सौंदर्यदृष्टी आणि शाश्वत विकास या कार्यक्रमातील मुलाखतीत ते म्हणाले. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola