Pune Rain Update | चंदननगर पोलिस स्टेशन पाण्यात, चिखलाचं साम्राज्य, मोठं नुकसान
पुण्यात पावसाने जोरदार हजेरी लावत अक्षरश: धुमाकूळ घातला. अनेक रस्ते, नाले पाण्याखाली गेले आहेत. काल संध्याकाळपासून पावसाने झोडपून काढले आहे. पुण्यामध्ये आता पाऊस थांबला आहे. काल कर्वेरोडवरचा नेहरु वस्तीमधील काही घरांमध्ये पाणी शिरलं होतं. आता वस्तीमधलं पाणी ओसरलं आहे. पण घरांमध्ये पाणी शिरल्याने खूप नुकसान झालं आहे. तसंच काही कोविड सेंटरमध्ये देखील पाणी शिरल्याने प्रशासनासह कोविड रुग्णांची देखील तारांबळ उडाली. पुण्यात पावसााने आता विश्रांती घेतली असली तर पुणे-अहमदनगर रस्त्यावरील पाणी कायम आहे.
Tags :
Mumbai Pune Rain IMD Alert Pune Rain Alert Rainfall Red Alert IMD Rainfall Alert Mumbai Pune Rainfall Alert IMD Warning Mumbai Rain Heavy Rain Rain Pune Rain Pune Rain Update Maharashtra Rain Rain Update Rain News Solapur Rain Rain Latest Update