Pune : शाळेतील मारहाणीचा बदला 16 वर्षांनी; शालेय मित्राकडून शिवीगाळ, बेदम मारहाण ABP Majha

शाळेतील मारहाणीचा बदला तब्बल सोळा वर्षांनी घेतल्याची घटना पुण्यात घडलीय. आरोपी विकी शिरतर यानं शालेय मित्र अमाेल कांबळे याला बेदम मारहाण केलीय. अमाेल कांबळे आणि आरोपी विकी शिरतर १६ वर्षापूर्वी एकाच शाळेत शिकत होते. अमाेल कांबळे हा २४ ऑक्टोबरच्या रात्री घरी जात असताना विकी शिरतरनं अमोलला गाठलं. त्यावेळी विकी म्हणाला, तू मला शाळेत असताना मारत हाेता आता तुला साेडणार नाही अशी धमकी दिली. आणि विकीनं अमोलला शिवीगाळ करत लाथा बुक्क्यांनी जबर मारहाण केली. याप्रकऱणी अमोलच्या तक्रारीवरुन पुण्यातील चतु:शृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola