Sarathi Sanstha | सारथी संस्थेच्या कार्यालयाबाहेर उपोषण, तरुण-तरुणींच्या मागण्या काय? | ABP Majha
सारथी संस्थेची स्वायत्तता कायम राखण्याच्या मागणीसाठी खासदार छत्रपती संभाजीराजे पुण्यात लाक्षणिक उपोषण करणार आहेत. थोड्याच वेळात ते पुण्यातील सारथी संस्थेच्या कार्यालयाबाहेर उपोषण सुरु करणार आहेत..
मराठा, कुणबी आणि कृषी क्षेत्रातील बहुजन समाजाच्या विकासासाठी सारथी संस्थेची स्थापन करण्यात आलीय. महाराष्ट्रातल्या सत्तांतरापूर्वी लागू करण्यात आलेल्या राष्ट्रपती राजवटीदरम्यान सचिव जे. पी. गुप्ता यांनी काढलेल्या परिपत्रकामुळं सारथी संस्थेसंदर्भात संभ्रमाचं वातावरण निर्माण झालंय. सारथी संस्था संपवण्याचा डाव असल्याचा आरोप खासदार संभाजीराजेंनी केलाय. संभाजी राजेंच्या या भूमिकेला मराठी क्रांती मोर्चानं देखील पाठिंबा दर्शवलाय..