Pune: येरवडा परिसरात निर्माणाधीन इमारतीचा स्लॅब कोसळला, 5 कामगारांचा मृत्यू ABP Majha
पुण्यातील येरवडा परिसरातील शास्त्रीनगर भागात असलेल्या निर्माणाधीन मॉलचा स्लॅब कोसळलाय. या दुर्घटनेत ५ कामगारांचा मृत्यू झालाय. काल रात्री पावणेअकराच्या सुमारास ही दुर्घटना घडलीय. स्लॅबसाठी बनवलेली लोखंडी जाळी अचानक कोसळली. ज्यावेळी ही दुर्घटना घडली त्यावेळी तिथे दहा कामगार काम करत होते. यातील पाच कामगारांचा मृत्यू झालाय. तर दुर्घटनेतील इतर जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या प्रकरणी दोषींवर गुन्हा दाखल करण्यात येईल अशी माहिती पोलिसांनी दिलीय.