Pune Weather : अवकाळीची विश्रांती, गारठा वाढला; किमान तापमानात घसरण ABP Majha
१-२ डिसेंबरला बरसणाऱ्या अवकाळी पावसानं कालपासून विश्रांती घेतलीय. पाऊस जरी थांबला असला तरी आता थंडीचा पारा वाढताना दिसतोय. किमान तापमान घसरायला सुरुवात झाल्यानं आता वातावरणातही गारवा वाढलाय. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भासह बहुतांश भागात थंडी वाढायला सुरुवात झालीए. काल पुणे, नाशिक, परभणीचं तापमान १५ अंशांपर्यंत आलं. ते आज आणि येत्या काही दिवसात १० अंशांखाली जाण्याची शक्यता आहे.