Puneमधील देहू संस्थानचे जुगारी विश्वस्तVishal Moreयांची हाकलपट्टी,तीन पत्त्यांचा जुगार खेळताना अटक

पुण्यातील देहू संस्थानचे जुगारी विश्वस्त विशाल मोरेंची अखेर हकालपट्टी झालीये. त्यांच्या जागेसाठी आता निवडणूक प्रक्रिया राबवली जात आहे. यात नाना मोरेंचा एकमेव अर्ज राहिलेला आहे. त्यामुळे जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या संस्थानावर त्यांची बिनविरोध निवड निश्चित मानली जात आहे. 16 ऑक्टोबरला याची औपचारिक घोषणा होणं बाकी आहे. विशाल मोरेना तीन पत्त्यांचा जुगार खेळताना रंगेहाथ अटक करण्यात आली होती. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या संस्थानचे ते विश्वस्त असल्याने वारकरी संप्रदायात मोठी नाराजी पसरली होती. त्यामुळेच संस्थानने जुगारी विश्वस्त विशाल मोरेंची हकालपट्टी केली. आता त्यांच्या जागी नाना मोरेंची वर्णी लागणार आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola