Pune Maharashtra : वाहतुकीचे नियम मोडल्यास लायसन्स रद्द होणार : ABP Majha
Continues below advertisement
आता जर तुम्ही वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन केलं तर तुमचं लायसन्स थेट तीन महिन्यांसाठी सस्पेंड केलं जाणार आहे. पिंपरी चिंचवड पोलिसांनी अशा साडेसहाशेहून अधिक लायसन्स सस्पेंड करण्यासाठी आरटीओकडे प्रस्ताव दिलेत. त्यातील 195 लायसेन्स सस्पेंडही झालेत. अशी कारवाई झाल्यावर संबंधित चालकांना लायसन्ससाठी नव्यानं प्रक्रिया राबवावी लागणार आहे. कारवाई झालेल्या चालकाने नव्यानं लायसन्स न काढता वाहन चालवल्यास १० हजारांचा दंड आकारला जाणार.
Continues below advertisement