Koregaon Bhima | 1 जानेवारी हा सामाजिक गुलामगिरीतून मुक्त होण्याचा दिवस : प्रकाश आंबेडकर
Continues below advertisement
वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी कोरेगाव भीमामधील विजय स्तंभाला आज सकाळी अभिवादन केलं. यावेळी प्रकाश आंबेडकर म्हणाले की, एक जानेवारी हा या देशातील सामाजिक गुलामगिरीतून मुक्त होण्याचा दिवस आहे असं आम्ही मानतो. पेशवाईच्या काळात जी अस्पृश्यता पाळली जात होती त्या विरोधातील हा लढा होता. हा लढा यशस्वी झाला. तेव्हापासून सुरू झालेली ही सोशल मुव्हमेंट खऱ्या अर्थाने जोपर्यंत लोकशाही येत नाही तोपर्यंत कायम राहील, असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले.
Continues below advertisement