Pune Unlock : पुण्यात निर्बंध शिथिल होणार? पालकमंत्री Ajit Pawar यांच्या उपस्थितीत दुपारी आढावा बैठक
पुण्यातील निर्बंधांबाबत निर्णय घेण्यासाठी आज दुपारी तीन वाजता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत पुण्यातील निर्बंध शिथील केले जाण्याची शक्यता आहे. पुण्यात सोमवार ते शुक्रवार दुकाने चार वाजेपर्यंत सुरु ठेवण्याची परवनगी आहे तर शनिवार आणि रविवार अत्यावश्यक सेवा वगळून इतर दुकाने बंद ठेवण्याचे आदेश आहेत.पुण्यातील व्यापाऱ्यांकडून मागील चार दिवसांपासून या निर्बंधांना सविनय कायदेभंगाच्या माध्यमातून विरोध करण्यात येतोय. त्यामुळे या बैठकीकडे पुणेकरांचे लक्ष लागलेले असेल.