Pune Bombblast Crime : पुण्यातील दहशतवादी सुनसान जागेवर जाऊन करायचे बॉम्बस्फोटाचा सराव, ATSचा सराव

पुणे पोलिसांनी पकडलेल्या दोघा दहशतवाद्यांकडून एटीएसला धक्कादायक माहिती मिळाली आहे. पुणे आणि परिसरातील सुनसान जागी जाऊन या दहशतवाद्यांनी बॉम्बस्फोट करण्याचा सराव केला होता, असं एटीएसच्या तपासात समोर आलं आहे. मोहम्मद युसुफ खान आणि मोहम्मद युसुफ या दोघा दहशतवाद्यांना मागील सोमवारी मध्यरात्री गस्तीवर असलेल्या दोन पोलीस कॉन्स्टेबल्सनी संशयास्पद हालचाली जाणवल्याने पकडले. यावेळी त्यांचा तिसरा साथीदार मोहम्मद शहनवाज आलम पळून गेला. त्यानंतर पोलीसांनी ते दोघे रहात असलेल्या कोंढव्यातील घरी जाऊन तपास केला. इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेसाठी ते काम करत असल्याच समोर आलं. महत्त्वाचे नकाशे आणि इतर साहित्य देखील त्यांच्याकडे आढळून आलं.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola