Pune Terrorist : पुण्यातून संशयित दहशतवादी अटकेत, महाराष्ट्र एटीएसची मोठी कारवाई

Continues below advertisement

पुण्यात दहशतवाद विरोधी पथक अर्थात एटीएसने मोठी कारवाई केलीय. पुण्यातील दापोडीतून जुनेद मोहम्मद या संशयिताला अटक करण्यात आलीय. जुनेद हा मूळचा बुलढाण्याच्या खामगावचा रहिवाशी असल्याची माहिती समोर आलीय. लष्कर ए तोयबासाठी काम करावं म्हणून जुनेदला पैसे मिळाल्याचे तपासातून समोर आलंय. राज्यातील तरुणांना लष्कर ए तोयबा संघटनेत सामील करून घेण्यासाठी आणि त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी जुनेद प्रयत्न करत होता अशी माहिती तपासात समोर आलीय. यासाठी जुनेदला जम्मू काश्मीरमधील अकाउंटवरुन पैसे मिळाल्याचंही तपासात निष्पन्न झालंय. सोशल मीडियाच्या माध्यमातून देशाच्या सुरक्षेला बाधा येईल अशा पोस्ट करण्याच्या प्रयत्नात जुनेद होता अशी माहिती समोर आलीय. या सगळ्या प्रकरणी जुनेदविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram