पुणे जिल्ह्यात उद्यापासून सात दिवस संचारबंदी, हॉटेल्स, बार, रेस्टॉरंट, मॉल, थिएटर्ससह बससेवा बंद

Continues below advertisement

Pune Mini Lockdown : महाराष्ट्रात कोरोनाचा कहर वाढत असताना जनतेत लॉकडाऊनची धास्ती कायम आहे.  या पार्श्वभूमीवर पुण्यात पुन्हा निर्बंध कडक करण्यात आले आहे. सर्व हॉटेल्स, बार, रेस्टॉरंट पुढील सात दिवसांसाठी बंद रहतील.  मात्र होम डिलीव्हरी सुरू राहील. मॉल आणि थिएटर्स देखील सात दिवसांसाठी बंद राहतील. आज पुण्यात पालकमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. यानंतर पुण्यात काही निर्बंध घालण्यात आले आहेत. संध्याकाळी सहा ते पहाटे सहा वाजेपर्यंत पुणे जिल्ह्यात उद्यापासून सात दिवस संचारबंदी घोषित करण्यात आली आहे. पुढील शुक्रवारी या परिस्थितीचा पुन्हा आढावा घेतला जाईल, असं  विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी सांगितलं.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram