Pune : टीईटीनंतर राज्यातील सर्वात मोठा घोटाळा उघड

Continues below advertisement

पुणे पोलिसांनी बनावट शैक्षणिक प्रमाणपत्र बनवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. ही टोळी दहावी नापास मुलांना चक्क पास असल्याचे प्रमाणपत्र वाटप करत होती. यासाठी महाराष्ट्र स्टेट ओपन स्कूल सारखी बनावट वेबसाईट देखील तयार करण्यात आली होती.  दहावी नापास असलेल्या तब्बल दोन हजार ७०० जणांना बनावट प्रमाणपत्र देत असल्याची माहिती पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेला मिळाली. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या रॅकेटचे मुख्य आरोपी छत्रपती संभाजीनगरचे आहेत. याप्रकरणी पोलिसांनी आत्तापर्यंत कृष्णा सोनाजी गिरी, अल्ताफ शेख आणि सय्यद इमरान सय्यद इब्राहिम यांना अटक केली आहे. तर टीईटीनंतर राज्यातील हा सर्वात मोठा घोटाळा समजला जातोय.

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram