PM Modi Pune Security : पुण्यात सुरक्षेसाठी विशेष सुरक्षा पथक म्हणजेच SPG आणि फोर्सवनचे जवान तैनात

पंतप्रधान नरेंद्र मोदी १ ऑगस्टला लोकमान्य टिळक पुरस्कार स्वीकारण्यासाठी पुण्यात येणार आहेत. या निमित्ताने पंतप्रधानांच्या सुरक्षेसाठी विशेष सुरक्षा पथक म्हणजेच SPG आणि फोर्सवनचे जवान तैनात असणार आहेत.  या शिवाय पाच हजार पोलिसांचा बंदोबस्त आहेच. पोलीस आयुक्त रितेश कुमार, सहपोलीस आयुक्त संदीप कर्णिक, अतिरिक्त आयुक्त प्रवीणकुमार पाटील आदींनी पुण्यातील बंदोबस्ताची आखणी केलीय. पंतप्रधानाच्या दौऱ्यानिमित्त मंगळवारी पुण्यातील वाहतूक व्यवस्थेतही बदल करण्यात आलेत. पंतप्रधान श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात जाणार आहे. तर स.प. महाविद्यालयाच्या मैदानावर पुरस्कार सोहळा आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola