Pune : श्रीमंत बाजीराव पेशवे यांची आज 321 वी जयंती, पुण्यात ब्राह्मण महासंघाच्या वतीनं मिरवणूक
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
18 Aug 2021 07:30 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appश्रीमंत बाजीराव पेशवे यांची आज ३२१ वी जयंती. त्यानिमित्ताने पुण्यात लाल महाल ते शनिवारवाडा अशी मिरवणूक ब्राह्मण महासंघाच्या वतीनं काढण्यात आली होती. या मिरवणुकीत घोड्यावर बसलेल्या बाल कलाकारांसह, पारंपरिक आणि पेशवेकालीन वेशभूषेत अनेकजण सहभागी झाले होते. यावेळी वाजत-गाजत फुगड्याही घालण्यात आल्या. शनिवारवाड्यावर मिरवणूक पोहचली तेव्हा माजी आमदार मेधा कुलकर्णींनीही फुगडी खेळली. परंतु यावेळी कोरोना नियमांचं उल्लंघन झाल्याचं दिसलं. अनेकांच्या चेहऱ्यावर मास्क लावलेला नव्हता, तर सामाजिक अंतराचं पालनही झालं नव्हतं.