Shivraj Singh Chouhan उद्या पुण्यात येणार,Madhya Pradesh मध्ये गुतंवणूक व्हावी यासाठी परिषदेचं आयोजन

महाराष्ट्रातल्या उद्योगपतींना मध्य प्रदेशमध्ये आकर्षित करण्यासाठी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान उद्या पुण्यात येणार आहेत. पुण्यात शुक्रवारी इन्व्हेस्ट एमपी या परिषदेचं आयोजन करण्यात आलंय. या परिषदेत शिवराजसिंह चौहान मध्य प्रदेशचे उद्योगमंत्री आणि आयएएस अधिकाऱ्यांसह उपस्थित राहणार आहेत. मध्य प्रदेशमध्ये औद्योगिक गुंतवणूक वाढावी यासाठी या परिषदेचं आयोजन करण्यात आलंय. इन्व्हेस्ट एम पी परिषदेनंतर शिवराजसिह चौहान उद्योगपती संजय किर्लोस्कर, बाबा कल्याणी, रवी पंडीत, अश्विनी मल्होत्रा, सुधीर मेहता या यांच्याशी वैयक्तिक चर्चा करणार आहेत. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola