Pune मधील पणन सहसंचालक Shashikant Ghorpade प्रकरणाचे गूढ वाढलं, साताऱ्याकडे जाताना घोरपडे बेपत्ता

राज्याचे पणन सहसंचालक शशिकांत घोरपडे प्रकरणाचे गूढ आणखी वाढलंय. घोरपडे अजूनही बेपत्ता आहे... दोन दिवसांपूर्वी घोरपडे पुण्याहून साताऱ्याला जाण्यासाठी निघाले.. मात्र पुण्याहून पुढे आल्यावर त्यांनी सारोळा गावाजवळ गाडी पार्क केली आणि तिथून पुढे ते चालत नीरा नदीच्या दिशेने चालत गेल्याचं सीसीटीव्ही कॅमेऱ्यातून समोर आलंय.. त्यानंतर शशिकांत घोरपडे यांच्याशी कोणताही संपर्क होऊ शकलेला नाही. त्यामुळे त्यांनी नीरा नदीत उडी मारून आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय. नीरा नदीच्या पात्रात शशिकांत घोरपडे यांचा शोध सुरु आहे...  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola