Sharad Pawar | शरद पवारांकडून पिंपरीतील आरोग्य यंत्रणेचा आढावा, महापालिका अधिकाऱ्यांची कानउघाडणी
Continues below advertisement
ष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांना पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात कसे योग्य उपचार दिले जातायेत. याबाबत राष्ट्रवादी, भाजपचे स्थानिक पदाधिकारी आणि पालिका आयुक्त टेंभा मिरवत होते. तेंव्हाच पवारांनी सर्वांचे कान टोचले. पुण्यात वेळेत सुविधा उपलब्ध न झाल्याने पत्रकार पांडुरंग रायकर यांचा मृत्यू झाला. या बाबीकडे पवारांनी बोट दाखवल आणि पिंपरीतल्या जंबो कोविड सेंटरमध्ये नेमकं कसे उपचार दिले जातायेत हा महत्वाचा प्रश्न असल्याचं म्हटलं. तुम्ही पाहताय पुण्यातील माध्यम प्रतिनिधीचा मृत्यू झाला. पत्रकार असो की सामान्य यात अनेक बिचाऱ्यांचे मृत्यू होतायेत. कोरोनासाठी स्वतंत्र व्यवस्था करूनही अनेक बाबी समोर येतायेत. डॉक्टर्स नाही, नर्स नाही, वेळेवर औषध नाही अशा तक्रारी येतायेत अशी खंत ही पवारांनी व्यक्त केली. काही अति करतात पण असं घडता कामा नये अशी सूचना ही पवारांनी यावेळी दिली.
Continues below advertisement